सृष्टीची कामगिरी गौरवास्पद : खा. दर्डा

By Admin | Updated: October 8, 2015 02:57 IST2015-10-08T02:57:40+5:302015-10-08T02:57:40+5:30

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,‘ सृष्टीची कामगिरी आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे.

Performance of the work is magnificent: eat Darda | सृष्टीची कामगिरी गौरवास्पद : खा. दर्डा

सृष्टीची कामगिरी गौरवास्पद : खा. दर्डा

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,‘ सृष्टीची कामगिरी आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या चिमुकल्या स्केटर्सकडून प्रेरणा घ्यावी. सृष्टी प्रतिभावान स्केटर आहेच शिवाय ती शालेय शिक्षणातही अव्वल असून परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवित सृष्टीने स्वत:ची योग्यता सिद्ध केली आहे.’ दर्डा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करण्याचे आवाहन केले. सेंटर पॉर्इंट स्कूलचे चेअरमन अरुणदेव उपाध्याय यांनी विदर्भासाठी आजचा दिवस मोठ्या उपलब्धीचा असल्याचे सांगितले. सृष्टीच्या या मोहिमेत लोकमतच्या भूमिकेचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी यशस्वी प्रयत्न केल्यानंतर सृष्टी शर्मा हिला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, सेंटर पॉर्इंट स्कूलचे चेअरमन अरुणदेव उपाध्याय तसेच महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी प्रमाणपत्र भेट दिले. याप्रसंगी डॉ. जयसिंग राजवाडे, राधिका राजवाडे, सेंटर पॉर्इंट स्कूलच्या कार्यकारी संचालिका मुक्ता चॅटर्जी, प्राचार्या सुमती वेणुगोपालन, सृष्टीचे वडील धर्मेंद्र आणि आई शिखा शर्मा आदी उपस्थित होते.

Web Title: Performance of the work is magnificent: eat Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.