शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 11:29 IST

राज्यातील सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

नागपूर : राज्यात आलेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले व लोकांच्या कल्पनाविस्ताराला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे गावांच्या नावासमोर खुर्द व बुद्रुक असे लिहिले जाते; तसेच राज्यात उपमुख्यमंत्री (खुर्द) व उपमुख्यमंत्री (बुद्रुक) अशी दोन पदे आहेत की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

रविवारी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट घेऊन अजित पवार सत्तेत सहभागी झाले. दरम्यान, राज्यातील या सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, नंतर ते शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले असून आता त्यावरुन नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. खुर्द व बुद्रुक अशी दोन पदे असल्याचे म्हणत कोपरखळ्याही देण्यात आल्या आहेत.  

दरम्यान, या भूकंपानंतर लगेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पदग्रहणानंतरच्या पहिल्या विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागताला राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. मात्र राजकीय रणधुमाळीचे केंद्रबिंदू असलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र स्वागताला कुठेही दिसले नाहीत. राजकीय बेरीज-वजाबाकी करण्यात व्यस्त असल्याने त्यांना राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी येता आले नाही की इतर काही व्यस्तता होती, असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र नागपूरला न आलेल्या पवार यांना आता उपमुख्यमंत्री (खुर्द) म्हणायचे की उपमुख्यमंत्री (बुद्रुक), हीच खरी चर्चा विमानतळावर उपस्थितांमध्ये रंगली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस