शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवस लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जीवनावश्यक वस्तुंसाठी नागपुरात लोकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:54 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशभरात २१ दिवसाचा ‘लॉकडाऊन’ घोषित करताच जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची धावपळ उडाली. लोकांनी कर्फ्यूला न जुमानता दुकानांमध्ये गर्दी केली.

ठळक मुद्देरात्री केली दुकानांमध्ये गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशभरात २१ दिवसाचा ‘लॉकडाऊन’ घोषित करताच जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची धावपळ उडाली. लोकांनी कर्फ्यूला न जुमानता दुकानांमध्ये गर्दी केली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनातर्फे अगोदरच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. ही संचारबंदी येत्या ३१ तारखेपर्यंत आहे. लोकांनी तेव्हापर्यंत सहकार्य करावे, असे शासनातर्र्फे सांगितले जात आहे. यातच जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही. त्या सुरू राहतील, असेही वारंवार सांगितले जात आहे. लोकांनीही आपले मन त्यासाठी तयार केले होते. यातच आज मंगळवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कोरोनाशी असलेला हा लढा जिंकण्यासाठी आणखी २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच लोकांनी घरीच राहावे, बाहेर पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे आणखी महिनाभर घरीच राहायचे असल्याने लोकांनी जीवनावश्यक वस्तूसाठी धावपळ केली. शहरात अनेक भागांमध्ये लोकांनी किराणाच्या दुकानामध्ये गर्दी केल्याचे सांगितले जाते. लोकांनी कर्फ्यूलाही जुमानले नाही. किराणा दुकान, फळ, पालेभाज्या, मेडिकल दुकानात नागरिकांनी गर्दी केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानMarketबाजार