शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

भारताबाहेरील लोकांना ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते

By योगेश पांडे | Updated: July 14, 2025 12:55 IST

सदानंद सप्रे : देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’चे डॉ. योगेश पांडे यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात विविध क्षेत्रांत सक्षम व कर्तृत्ववान असलेले लोक होऊन गेले आहेत. मात्र, भारताबाहेरील लोकांना जाणूनबुजून ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते. अशा तत्त्वांचा विरोध करताना सकारात्मकतेतून आदर्श प्रस्थापित करण्यावर भर असला पाहिजे. अशाच सकारात्मक विचारसरणीतूनच देवर्षी नारद हे पत्रकारांचे आदर्श असल्याची बाब प्रस्थापित झाली आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाह संस्थेचे अखिल भारतीय सदस्य सदानंद सप्रे यांनी केले. विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वनामती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, निवड समितीचे प्रमुख सुधीर पाठक व संघाचे प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध पत्रकार ऋचा अनिरुद्ध या ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होत्या. मुद्रित माध्यमांतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक डॉ. योगेश प्रकाश पांडे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय योगेंद्र तिवारी, नरेश शेळके, राखी चव्हाण, सतीश राऊत, आशिष भारतवंशी, दिवाकर सावरकर, तरुण जगनाडे, वैभव बावनकर, आरजे पल्लवी, ऐश्वर्या शिंदे, वेदिका मिश्रा, प्रियांशू चौधरी यांचाही पुरस्काराने सन्मान झाला. 

पत्रकारिता हे राष्ट्रसेवेचे माध्यम अनेक जण समजतात. मात्र, त्यातून केवळ व्यक्तिगत समाधान न मिळवता सर्वांनाच तसे करण्यावर भर असला पाहिजे, असे सप्रे म्हणाले. माध्यमांमध्ये वादविवाद दिसून येतो. मात्र कुटुंब व समाजातदेखील तशीच स्थितीत दिसून येते. जर माध्यमांत वाईट गोष्टी दाखविल्या जात असतील तर ते बघणे किंवा वाचणे आपण थांबवावे, असे मत राजेश लोया यांनी व्यक्त केले.पत्रकारांनी देशाकरिता काय योग्य आहे आणि काय नाही, याचा विचार करून बातम्या द्याव्या, असे आवाहन यावेळी सुधीर पाठक यांनी केले. जय गाला यांनी संचालन केले तर साक्षी सरोदेने वैयक्तिक गीत सादर केले.

‘रील’ संस्कृती पत्रकारितेसाठी घातक : ऋचा अनिरुद्धआजकाल प्रसारमाध्यमांतून एखादा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी त्यावर चर्चा घडविले जाते. त्यातही सध्या रील संस्कृती वाढली असून, ही पत्रकारितेच्या तत्त्व व दर्जासाठी घातक आहे. पत्रकारितेतून नकारात्मकता न मांडता समाजातील चांगल्या गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सध्या भाषेवरून होणारे वाद दुर्दैवी आहेत. पत्रकारांनी हा भाषावाद संपविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेदेखील त्या म्हणाल्या.

टॅग्स :nagpurनागपूरJournalistपत्रकार