डेंग्युमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद, ३० दिवसांत २९५ रुग्ण
By सुमेध वाघमार | Updated: October 2, 2023 17:52 IST2023-10-02T17:48:46+5:302023-10-02T17:52:37+5:30
आतापर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराचे ७,०६१ रुग्णांची नोंद

डेंग्युमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद, ३० दिवसांत २९५ रुग्ण
नागपूर : डेंग्यूमुळेनागपूरची जनता चांगलीच गारद झाली आहे. मागील ३०दिवसांत डेंग्यूचे २९५ रुग्ण आढळून आले आहेत. १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ६८७ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराचे ७,०६१ रुग्णांची नोंद झाली आहे.
एक डास माणसांची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव नागपुरकर अनुभवत आहे. डेंग्यूवर अद्यापही स्पष्ट उपचार नाहीत. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आजही जागोजागी पावसाचे पाणी साचून आहे. पाऊस परतीच्या मार्गावर असला तरी सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.