‘ऐ मेरे वतन के लोगों’ आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2015 03:18 IST2015-08-14T03:18:43+5:302015-08-14T03:18:43+5:30

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व जयहिंद फाऊंडेशनचा पुढाकार

'The people of my countrymen' today | ‘ऐ मेरे वतन के लोगों’ आज

‘ऐ मेरे वतन के लोगों’ आज

नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने ‘आय लव्ह माय इंडिया- ऐ मेरे वतन के लोगों’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी सांगितले, संगीताच्या माध्यमातून देशभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये देशभक्तिपूर्ण गीत, संगीत आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात येईल. या संगीत संध्याचे मुख्य सहयोगी लोढा टीएमटी, आॅरेंज अ‍ॅण्ड कॉटन बिल्डकॉन प्रा.लि., आयएनआयएफडी आणि महावीर मेवावाला आहेत. जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने असे अनेक कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाच्या केवळ ४०० प्रवेशिका लोकमत सखी मंच कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रथम येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी दोन प्रवेशिका दिल्या जातील.
शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून प्रवेशिकांचे वितरण सुरू होईल. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच संयोजक नेहा जोशी यांच्याशी २४२९३५५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)

Web Title: 'The people of my countrymen' today