काँग्रेसचे लोक देशाची दिशाभूल करत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:35 IST2020-01-03T13:35:04+5:302020-01-03T13:35:35+5:30

सीएए हा नागरिकता देणारा कायदा आहे. तो देशातील नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा नाही. काँग्रेसचे लोक संसदेत काही बोलत नाहीत मात्र बाहेर देशाची दिशाभूल करतात असा आरोप केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.

The people of Congress are misleading the country | काँग्रेसचे लोक देशाची दिशाभूल करत आहेत

काँग्रेसचे लोक देशाची दिशाभूल करत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सीएए हा नागरिकता देणारा कायदा आहे. तो देशातील नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा नाही. काँग्रेसचे लोक संसदेत काही बोलत नाहीत मात्र बाहेर देशाची दिशाभूल करतात असा आरोप केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.
या कायद्यातील एक तरी शब्द नागरिकत्व हिरावून घेत असल्याचे दाखवून द्यावे. हे सोनिया व राहूलला जाहीर आव्हान आहे असे ते यावेळी म्हणाले. देशातील इतर अल्पसंख्यकांवर अन्याय होत असताना विरोधकांसह शिवसेना गप्प का आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने ७० वर्ष वोटबँकेचे राजकारण केले आहे. संवैधानिक पातळीवर आम्ही एकदम बरोबर आहोत. जर हिंमत असेल तर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Web Title: The people of Congress are misleading the country