शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रोडवर बाजूला होण्यावरून हॉर्न वाजवला, पादचाऱ्याने लोखंडी कड्याने केली तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:11 IST

Nagpur : रोडवर पायी चालणाऱ्यांनी थोडे बाजूला व्हावे म्हणून कारचालक तरुणाने हॉर्न वाजविला आणि भांडणाला सुरुवात झाली. तरुण कारच्या खाली उतरताच पादचाऱ्याने त्याच्या डोक्यावर हातातील लोखंडी कड्याने जबर वार केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककामठी : रोडवर पायी चालणाऱ्यांनी थोडे बाजूला व्हावे म्हणून कारचालक तरुणाने हॉर्न वाजविला आणि भांडणाला सुरुवात झाली. तरुण कारच्या खाली उतरताच पादचाऱ्याने त्याच्या डोक्यावर हातातील लोखंडी कड्याने जबर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून, कामठी (जुनी) पोलिसांनी आरोपीस अटक केली. या घटनेमुळे कामठीतील धुळवडीला गालबोट लागले. ही घटना कामठी शहरातील खलाशी लाइन परिसरात मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.

रवी शिवकुमार अरगुटलेवार (२७, रा. बजरंग पार्क, कामठी) असे मृत तरुणाचे तर अक्षय धनराज गेडाम (३०, रा. खलाशी लाइन, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रवी व त्याचा मित्र मोनिश सुमेम अबडवार (२५, रा. मच्छीपूल, कामठी) मंगळवारी सायंकाळी एमएच-४०/डीई-४६४२ क्रमांकाच्या कारने घोरपड (ता. कामठी) येथून कामठी शहरात येत होते. मोनिश कार चालवित होता तर रवी बाजूला बसला होता. ते कामठीतील प्रबुद्ध वाचनालयाजवळ पोहोचताच समोर अक्षय गेडाम हा त्याच्या बहीण, वहिनी व पुतणीसोबत पायी घराकडे जात होता. 

चौघांनी थोडे बाजूला व्हावे म्हणून मोनिशने हॉर्न वाजविला. मात्र, अक्षय बाजूला न होता शिवीगाळ करीत थेट रवीच्या दिशेने कारकडे चालत आला व त्याने भांडणाला सुरुवात केली. रवी कारच्या खाली उतरताच भांडण विकोपास केले आणि अक्षयने रवीच्या डोके व पाठीवर हातातील लोखंडी कड्याने जोरात वार केले. तो गंभीर जखमी होताच अक्षय पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, ठाणेदार प्रशांत जुमळे व महेश आंधळे, पोलिस उपनिरीक्षक आकाश महल्ले, मिलिंद मेश्राम, सागर भंडारी यांनी अक्षयचा शोध घेत त्याला कामठीतून ताब्यात घेत अटक केली. 

तणावसदृश स्थिती

या घटनेची माहिती मिळताच मृत रवीच्या कुटुंबीयांसह नागरिक मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास कामठी (जुनी) पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गोळा झाले. त्यांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करताच तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. निखिल पखाले यांनी रवीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे सकारात्मक आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले. त्यानंतर रात्री उशिरा कामठी (जुनी) पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ (१) गुन्हा दाखल केला.

उपचारादरम्यान मृत्यू

लोखंडी कड्याने जबर वार केल्याने गंभीर दुखापत झाली व रवी खाली कोसळला. कोसळताच सिमेंट रोडवर डोके आदळल्याने तो आणखी जखमी झाला व घटनास्थळीच बेशुद्ध पडला. मोनिशने परिसरातील नागरिकांच्या मदतीने रवीला जवळच असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. प्रथमोपचारानंतर त्याला नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Argument over honking leads to fatal attack in Kamthi.

Web Summary : In Kamthi, a pedestrian fatally attacked a young man with an iron bangle after an argument over honking. The victim died during treatment, and the accused has been arrested. The incident occurred near Khalaashi Line, casting a shadow over the Holi celebrations.
टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर