शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

शेतकऱ्याला सात हजार रुपये भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:55 PM

बिघडलेला मोटर पंप बदलवून देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चाकरिता २ हजार अशी एकूण ७ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम पॉलिमर्स इंडिया कंपनीला दिला.

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : बिघडलेला मोटर पंप बदलवून देण्यास विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्याला शारीरिक मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चाकरिता २ हजार अशी एकूण ७ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम पॉलिमर्स इंडिया कंपनीला दिला. मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी ही तक्रार निकाली काढली.बबन तुळशीराम उराडे असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून ते भंडारा येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, उराडे यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मौदा पंचायत समितीमार्फत मोटर पंप वाटप करण्यात आला होता. तो मोटर पंप श्रीराम पॉलिमर्स इंडिया कंपनीकडून खरेदी करण्यात आला होता. उराडे यांनी त्या मोटर पंपकरिता ९ हजार ५०० रुपये अदा केले होते. तो मोटर पंप वॉरन्टी काळात २७ मे २०१८ रोजी बंद पडला. उराडे यांनी त्यासंदर्भात तक्रारी केल्या, पण त्यांना मोटर पंप बदलवून देण्यात आला नाही. तसेच, त्यांची रक्कमही परत देण्यात आली नाही. दरम्यान, त्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल करून मोटर पंपची रक्कम व भरपाई मिळण्याची मागणी केली होती. ही तक्रार प्रलंबित असताना उराडे यांना नवीन मोटर पंप देण्यात आला. त्यामुळे मंचने उराडे यांना केवळ भरपाई मंजूर केली.सेवेत त्रुटी ठेवलीउराडे यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना ताबडतोब मोटर पंप बदलवून देणे आवश्यक होते. परंतु, त्यांना मंचमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर नवीन मोटर पंप देण्यात आला. ही कंपनीच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे उराडे यांना शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचFarmerशेतकरी