शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मनपा सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या : वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:54 PM

कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देकामाच्या स्वरुपानुसार वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलन आणि व्यवस्थापनाकरिता नियुक्त ए.जी.एन्व्हायरो व बी.व्ही.जी. या एजन्सीमध्ये नियुक्त सफाई कर्मचारी व ऐवजदारांच्या वेतनाबाबत संभ्रम आहेत. कर्मचाऱ्यांच्या कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार या वर्गवारीनुसार दोन्ही एजन्सीकडून वेतन दिले जाते. मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शुक्रवारी दिले.आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वीरेंद्र कुकरेजा, विशेष आमंत्रित सदस्य प्रफुल्ल गुडधे, समिती सदस्य लहुकुमार बेहते, कमलेश चौधरी, संजय बुर्रेवार, सदस्या लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे, आशा उईके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.मनपाद्वारे गतकाळात नियुक्त कनक रिसोर्स मॅनेजमेंट यांचेकडून दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा नवीन एजन्सीकडून सफाई कर्मचाऱ्यांना जास्त वेतन देण्याचे आधीच निर्धारित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सफाई कर्मचाऱ्यांना नवीन एजन्सीकडून त्या तुलनेत कमी वेतन दिले जाते. असे प्रफुल्ल गुडधे यांनी निदर्शनास आणले. याची दखल घेत मनपाकरिता काम करणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश कुकरेजा यांनी दिले.

स्वच्छता शुल्क; आयुक्त देणार अभिप्रायघराघरातून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यासाठी मनपातर्फे ६० रुपये प्रति महिना स्वच्छता शुल्क आकारले जाते. याबाबत संभ्रम असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संबंधित विषय वर्ग करून त्यावर त्यांचा अभिप्राय घेण्यात येईल. यानंतर समितीकडून सदर विषय सभागृहामध्ये सादर केला जाणार असल्याचे आरोग्य समिती सभापतींनी सांगितले.

 सर्व दहनघाटांवर सुविधा पुरवा    शहरातील १६ घाटांवर मनपातर्फे सुविधा पुरविण्यात येते. मात्र चार  दहन घाटावर सुविधा पुरविली जात नाही. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठे अंतर गाठावे लागते. मनपाच्या अधिकृत १६ दहन घाटांप्रमाणेच इतरही दहन घाटांवर सुविधा पुरविण्यात यावी. दहन घाटांवर लाकडांची व्यवस्था, त्यासाठी शेडची निर्मिती, सुरक्षा रक्षक व अन्य सुविधा येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत पुरविण्याचे निर्देश वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी