शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

‘पवार’बाह्य मुख्यमंत्री शिक्षक संघटनांना खुपतात - विनोद तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:43 PM

शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही.

- योगेश पांडेनागपूर : शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही. परंतु ‘पवार’बाह्य मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री झाल्यामुळे शिक्षक संघटनांना शाळाबाह्य कामांच्या मुद्याची आठवण आली आहे, या शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांवर टीकास्त्र सोडले.शालेय तसेच उच्च शिक्षणासंदर्भातील विविध मुद्यांवर तावडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारित निवड होऊन निवड प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षक पदांची भरती ‘पवित्र’ या केंद्रीय परीक्षा पध्दतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याविरोधात काही शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. मात्र न्यायालयाने शासनाची भूमिका उचलून धरली.मुळात पैसे देऊन नोकरी मिळविल्यानंतर हेच शिक्षक आंदोलने करतात व प्रशासन-मंत्र्यांना शिव्यांची लाखोळी वाहतात. या ‘पवित्र’मुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण येणार असल्याचा त्यांनी दावा केला.शिक्षक आमदारांचे गणित कच्चेपटसंख्या कमी असणा-या आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेल्या जिल्हा परिषदेच्या राज्यातील १ हजार ३१७ प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त १३ हजार विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित करावे लागेल. मात्र काही शिक्षक आमदार याला राजकीय स्वरूप देत असून यामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित रहावे लागेल, असा प्रचार करीत आहेत. शिक्षक आमदारांचे गणित बहुधा कच्चे असावे, असा चिमटा तावडे यांनी यावेळी काढला. काही शिक्षक आमदार दिशाभूल करीत असून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापेक्षा त्यांना शिक्षक बदलीचा प्रश्न जास्त सतावतो आहे, असेदेखील तावडेंनी प्रतिपादन केले.विद्यार्थी निवडणुका पुढील वर्षीपासूननवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने होतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र निवडणुका घेण्यासाठी नियम व परिनियम तयार होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र आता अर्धे सत्र निघून गेले आहे. आता निवडणुका घेणे योग्य होणार नाही.त्यामुळे जून २०१८ मध्ये यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येईल व पुढील शैक्षणिक सत्रापासून निवडणूका होतील, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७