आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 14:24 IST2023-05-22T14:20:44+5:302023-05-22T14:24:57+5:30
बँडबाजावर जोरदार नाच, कार्यकर्त्यांचा उत्साह

आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी
नागपूर : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळातच त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होत असून कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली आहे. ढोल ताशांच्या गजरात, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला. जय भवानी जय शिवाजी, आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या गजरात कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरलाय.
आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रदूषित गावांची पाहणी करणार असून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या आगमनानिमित्त कार्यकर्त्यांनी विमानतळावर एकच जल्लोष सुरू केला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच नागपूरमध्ये लागलेल्या पोस्टर्सनी राजकीय वर्तुळाच लक्ष वेधून घेतलं आहे. भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर असलेले पोस्टर्स रामटेक व कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्थानकावर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे.