शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता पंचायत समितीने ५० ग्रामपंचायतीसाठी ...

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता पंचायत समितीने ५० ग्रामपंचायतीसाठी चार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांनी मंगळवारी दिली.

तालुक्यात ५० ग्रामपंचायतींअंतर्गत एकूण २२४३ घरकुलांचे लक्ष्यांक मिळाले आहे. त्यांपैकी १८३६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यातून आजपर्यंत ७२३ घरकुल पूर्ण झाले आहेत. तालुक्यामध्ये महाआवास अभियान (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविले जात आहे. यात तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलांना १०० टक्के मंजुरी देणे, करारनामा करणे, जागा नसलेल्या लाभा‌र्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नियमित करणे, इत्यादी कामे वेळेमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.

याकरिता कनिष्ठ अभियंता सतीश अकर्ते यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच ५० ग्रामपंचायतींची चार भागांत विभागणी करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील घरकुलांना वेळोवेळी भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेणे व अपूर्ण घरकुल वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी शाखा अभियंता पी. आर. खवले, कनिष्ठ अभियंता प्रशांत कुंटे, कनिष्ठ अभियंता एस. आर. अकर्ते, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक मंगेश गणवीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.