सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
मानुषी छिल्लर नावाच्या भारतीय तरुणीने यंदाचा ‘मिस वर्ल्ड’ खिताब जिंकून आणला. तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढविण्यात तिच्या दिलखेचक कपड्यांचा सिंहाचा वाटा होता. अन् हे झळाळते वस्त्र कसे असावे याचा निर्णय कुणी घेतला? यवतमाळच्या मुलीने..! हो, शिफ ...
मनात आणल्यास कोणतीही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न विश्व स्पर्धेच्या आयोजनाद्वारे होणार आहे. यातून भारताला माझ्यासारख्या आणखी युवा मेरी कोम गवसतील, असा विश्वास विश्व आणि आशियाई चॅम्पियन एम. सी. मेरी कोम हिने व्यक्त केला आहे. ...
नागपूर : विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणा-या आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही. ...
शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरापासून हत्यासत्र सुरू झाल्याने नागपूरकर दहशतीत आले आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर नामक तरुणाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात थरार निर्माण झाला असतानाच आज गुरुवार ...
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘जाई’ वाघिणीच्या दोन्ही किडनी साप चावल्यामुळे निकामी झाल्या आहेत. वाघिण सक्रिय दिसत आहे, पण के्रटिनचा स्तर वाढल्यामुळे तिने खाणेपिणे सोडल्याने प्रकृती खालावली आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापीठ परिषदेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच चढली आहे. संघटनांनी प्रतिष्ठेचा बनविलेल्या या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी शिक्षक व प्राचार्याच्या संघटनांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे. ...