लाखोंचे बिल थकीत ठेवून युवा अभियंत्याची आर्थिक कोंडी करून त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे बीएसएनएलमध्ये प ...
नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा विदर्भ देण्याची येथील हिंदी भाषकाची मागणी असल्याचे वक्तव्य केले. मुळात शरद पवारांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण करून भांडणे लावू नये व विदर्भाची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये, ...
चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. ...
युवक काँग्रेसचे नागपूर लोकसभा अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांना पक्षातर्फे प्रमोशन देण्यात आले आहे. त्यांची अ.भा. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
निवडणुकीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. ...
न्यायाधीशांच्या विरोधातील गंभीर तक्रारींच्या चौकशीसाठी व नियुक्तीसाठी ‘न्यायिक लोकपाल’ सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले. ...
पत्रकाराच्या मुलीची आणि आईची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास सहायक पोलीस आयुक्त समाधानकारक पद्धतीने करताना दिसत नाही. उलट ते हेकेखोर पद्धतीने वागून पीडित परिवारावरच दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा तपास काढून तो गुन्हे ...
भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर १ मार्च रोजी विदर्भा ...
भारतीय राष्ट्रध्वजावर सम्राट अशोक यांचे धम्मचक्र अंकित आहे. अशोकाचे हे धम्मचक्र म्हणजे बुद्धाने सांगितलेला कार्यकारणभाव (प्रतित्य समुत्पाद) होय, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी येथे केले. ...