तुम्ही घरात आहात यामुळे केवळ कोरोना विषाणूची साखळी तुटतेय असे नाही तर या संचारबंदीचा फायदा निसर्गालाही होत आहे. आपल्या नागपूर शहराचे प्रदूषण कमालीचे घटत आहे. होय, शहराचे प्रदूषण निम्म्याने कमी झाले आहे. ...
ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना घातली. ...
नागपूर महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सर्व दहा झोनमध्ये आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आय ...
रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहेत, अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे. ...
होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघा ...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले.या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. ...
वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ...