कोरोना रुग्णामध्ये प्रामुख्याने ताप, कोरडा खोकला आणि श्वास लागण्याची लक्षणे दिसून येतात. परंतु यापूर्वी मेंदूमध्ये काही लक्षणे दिसून येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मेंदू संसर्ग विभागाचे प्रमुख डॉ. अविन्द्र नाथ यांनी ...
सोमवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ...
सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही. ...
सरकारी विभागांनी २०१९-२० या वर्षात केलेल्या खर्चाची बिले १ एप्रिलनंतरही स्वीकारले जातील. अंतिम तारखेचे परिपत्रक यात अडथळा ठरणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
वैद्यकीय, भोजन यासारख्या आवश्यक वस्तूंसाठी स्पेशल पार्सल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या गोधनी रेल्वेस्थानकावरून न्यू तिनसुकिया दरम्यान ३१ मार्चला स्पेशल पार्सल गाडी चालविण्यात येणार आहे. ...