कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद आहेत. या संकटाच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यापर्यंत वीज बिलात ‘फिक्स्ड चार्ज’ न वसुलण्याचे जाहीर केले आहे. ...
रेशनकार्ड नसलेल्यांची यादी तयार करताना अनेक परिवार जीवनावश्यक किटपासून वंचित राहिले आहेत. अशा परिवारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, त्यांना खनिज निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात यावे, या मागणीसाठी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवीं ...
कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ३३३ चमूंच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. १४ एप्रिल पर्यंत शहरातील ५ लाख ५८ हजार ९४ घरांंचा सर्वे करण्यात आला असून २३ लाख ८५ ...
बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने मुदतीपूर्वी जन्म दिलेले अर्भक मरण पावले. मुलीच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांना अर्भक बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपचार करावे लागले. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, अ ...
१९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे. ...
लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ...
साधारणत: २० मेनंतरच परीक्षांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नेमलेली समिती नेमका काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. ...
दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. ...