हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बनावट सह्या आणि खोट्या नोंदी करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ६ लाख, २२ हजार ६९० रुपये हडपल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. ...
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहते. मुंढे हुकूमशाही करतात, असा आरोप त्यांनी केला असताना आम आदमी पक्षाने मात्र त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ७ मधील नाईक तलाव-बैरागीपुरा व आसीनगर झोनमधील प्रभाग ३ मधील मेहबूबनगर, संघर्षनगर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या ...
दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देण्यासाठी आदिवासी विभागाने २०१०-११ पासून योजना राबविली होती. शहरातील नामांकित शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीत प्रवेश दिला जात होता. मुलांच् ...
कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. ...
मोबाईलवर व्हॉट्सअॅप बिझनेस ग्रुपच्या नावाखाली मोबाईलमध्ये जुगाऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन जुगार उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली. ...
उपराजधानीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी गुडिया शाहू हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. ...