नागपूर तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ : ४२ बंदिवानांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:53 PM2020-07-03T22:53:43+5:302020-07-03T22:55:21+5:30

कोरोनाचा संसर्ग आता एका वसाहतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रोज नव्या वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत असताना आता तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठवड्याभरात ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहिल्यांदाच ४२ बंदिवानाची भर पडल्याने खळबळ उडाली.

Corona infestation in Nagpur jail too: 42 inmates infected | नागपूर तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ : ४२ बंदिवानांना लागण

नागपूर तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ : ४२ बंदिवानांना लागण

Next
ठळक मुद्दे५८ नव्या रुग्णांची भर : रुग्णांची संख्या १६८१

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग आता एका वसाहतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रोज नव्या वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत असताना आता तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठवड्याभरात ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहिल्यांदाच ४२ बंदिवानाची भर पडल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ५८ नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १६८१ वर पोहचली आहे.नाागपुरात पहिल्यांदाच गेल्या तीन दिवसात १७६ रुग्ण आढळून आले. यात आता बंदिवानही सुटले नसल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. मध्यवर्ती कारागृहात कोरोनाची लागण एका कर्मचाऱ्यांकडून झाली. २५ जून रोजी या कर्मचाºयाची प्रकृती खालावली. २७ जून रोजी त्याला मेडिकलमध्ये भरती केले. २८ जून रोजी कोविड पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारागृहात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात झाली. परंतु तोपर्यंत कोरोनाची लागण पसरल्याने सुरुवातीला एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी पॉझिटिव्ह आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह इतरही कर्मचारी असे तब्बल ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गुरुवारी सकाळी कारागृहातीलच एका डॉक्टरांसह व एका महिला पोलीस अधिकाºयासह १२ कर्मचारी तर रात्री तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये १२ बंदिवान पॉझिटिव्ह आले. आज पुन्हा ३० बंदिवानांची भर पडली. आतापर्यंत कारागृहातील ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या ४२ बंदिवानांना कारागृहातीलच हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या कारागृहात १८००वर बंदिवान आहेत.

झिंगाबाई टाकळीत रुग्ण वाढले
नीरीच्या प्रयोगशाळेतून १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते. विशेष म्हणजे यात झिंगाबाई टाकळी येथील तब्बल १० तर फ्रेंड्स कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. टाकळी परिसरातील नागरिक कोणत्याही प्रकारे नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस व प्रशासनाने कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मिल्ट्री हॉस्पिटल कामठी येथील २, कारागृहातील ३०, तर पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधील २ रुग्णांचा समावेश आहे. माफसू प्रयोगशाळेतून पाचपावली क्वारंटाईन सेंटरमधील आठ रुग्ण, मेडिकलमधून तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमधून एका रुग्णांची नोंद झाली.

२९ रुग्णांना डिस्चार्ज
मेडिकलमधून २३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात २० रुग्ण नाईक तलाव-बांगलादेश येथील असून उर्वरित एक रुग्ण यवतमाळ तर दोन रुग्ण जयबजरंगनगर येथील आहेत. एम्समधून नरेंद्रनगर येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मेयोमधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात इतवारी, त्रिमूर्तीनगरातील प्रत्येकी एक तर मोमीनपुरा येथील दोन रुग्ण आहेत. आज २९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३११वर पोहचली आहे.

संशयित : १६७९
अहवाल प्राप्त : २६३०५
बाधित रुग्ण : १६८१
घरी सोडलेले : १३११
मृत्यू : २५

Web Title: Corona infestation in Nagpur jail too: 42 inmates infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.