गो-एअरने आपली शक्कल लढवून प्रत्यक्ष परतावा न देता १,३४,७५० रुपये क्रेडिट शेल ठेवून घेतले. ते प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध असून गो-एअरच्या भूमिकेबद्दल पांडे यांनी नापसंती व्यक्त केली. ...
मोठ्या आवाजात गाडी चालवून रस्त्यावर हैदोस घालणाऱ्या बाईकर्सविरुद्ध वाहतूक शाखेने विशेष मोहीम चालवीत ३,८१८ चालकांविरुद्ध कारवाई केली. केवळ पाच दिवसात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उपराजधानीत वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वन मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे. ...
२० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. ...
पदाधिकारी व नगरसेवक हे जणू चोर असल्याची प्रतिमा निर्माण करून शहर विकासाला ब्रेक लावू नका, असे शाब्दिक बाण मंगळवारी महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोडले. ...
गेल्या दोन महिन्यापासून रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत असलेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. ...
भाजीविक्रेत्यावर तिखट पावडर फेकून त्याची रक्कम लुटू पाहणाऱ्या एका गुन्हेगारावर पत्रकार आणि पोलिसांनी झडप घातली. त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून गुन्हेगार पळून गेला. ...