रेशनच्या तांदळाची ग्राहकांकडून खरेदी : आरोपी ठेकेदार सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:35 AM2020-08-01T00:35:10+5:302020-08-01T00:37:08+5:30

कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत देण्यात आलेला रेशनचा तांदूळ नागरिकांकडून विकत घेऊन तो बाजारात विकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला.

Purchase of ration rice from customers: Accused contractor found | रेशनच्या तांदळाची ग्राहकांकडून खरेदी : आरोपी ठेकेदार सापडला

रेशनच्या तांदळाची ग्राहकांकडून खरेदी : आरोपी ठेकेदार सापडला

Next
ठळक मुद्दे१५ टन तांदूळ जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत देण्यात आलेला रेशनचा तांदूळ नागरिकांकडून विकत घेऊन तो बाजारात विकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला. आसिफ लाला नामक इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक ट्रक तसेच दोन ऑटो आणि त्यामधील सुमारे १५ टन तांदूळ जप्त केला.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांना शुक्रवारी दुपारी एकाने माहिती दिली. सरकारकडून नागरिकांना मोफत देण्यात आलेला तांदूळ एक ठेकेदार विकत घेऊन त्याची बाजारात विक्री करतो, अशी ही माहिती होती. त्यामुळे उपायुक्त नीलोत्पल यांनी ठाणेदार खुशाल तिजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आज दुपारी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदनलाल गुप्तानगरमध्ये पाठविले. तेथे नागरिकांकडून तांदूळ विकत घेऊन तो ट्रक आणि ऑटोमध्ये भरला जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी आसिफ लाला नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १ ट्रक तसेच २ऑटो आणि त्यात ठेवण्यात आलेला सुमारे १५ टन रेशनचा तांदूळ जप्त केला. जरीपटकाचे ठाणेदार तिजारे, पोलीस हवालदार हरिचंद्र भट, गजेंद्र ठाकूर, शिपाई संदीप वानखेडे आणि गणेश गुप्ता यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Purchase of ration rice from customers: Accused contractor found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.