शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! नागपुरात सहावीतील विद्यार्थ्याला व्हॅन चालकाने लावले ई-सिगारेटचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 00:04 IST

पोलिसाच्या मुलाची प्रकृती बिघडली : शाळेच्या स्वच्छतागृहातदेखील ओढायचा ई-सिगारेट

- योगेश पांडे,नागपूरमागील काही काळापासून शहरात सिगारेट्स व ई-सिगारेट्सच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शहरातील पालकांना हादरविणारी घटना एका नामांकित शाळेत घडली आहे. कोचिंग क्लासच्या एका व्हॅनचालकाने चक्क नामांकित शाळेतील सहावीतील विद्यार्थ्याला ई-सिगारेटच्या व्यसनाच्या नादी लावले. वडील पोलिस विभागात असलेल्या संबंधित विद्यार्थ्याने घरून पैसेदेखील चोरले. सिगारेटच्या व्यसनामुळे त्याची प्रकृतीदेखील बिघडली. शाळेच्या स्वच्छतागृहात ई-सिगारेट ओढताना पकडला गेल्यावर या प्रकाराचा भंडाफोड झाला. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

वरुण सोनी (२४, पोलिस लाइन टाकळी) असे आरोपी व्हॅनचालकाचे नाव आहे. तो एका कोचिंग क्लास ॲकेडमीसाठी व्हॅन चालविण्याचे काम करतो. पोलिस विभागात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या १२ वर्षीय मुलाशी त्याची ओळख झाली होती. वरुणला ई-सिगारेटचे व्यसन आहे. त्याने सहावीतील मुलाला एकटे गाठून काही काळाअगोदर त्याला ई-सिगारेट एकदा ओढून पाहा, असे म्हटले. 

लहान मुलाला काहीही न समजल्याने त्याने ती सिगारेट ओढली. फ्लेव्हर्ड वॅप असल्याने अजाणत्या विद्यार्थ्याला त्यात नवलाई वाटली. त्याने वरुणच्या सांगण्यावरून अनेकदा सिगारेट ओढली. जर तुलादेखील अशीच सिगारेट हवी असेल तर पाचशे रुपये लागतील, असे वरुणने विद्यार्थ्याला म्हटले. 

विद्यार्थ्याने आईच्या पर्समधून पाचशे रुपये चुपचाप काढले व ते वरुणला दिले. वरुणने त्याला फ्लेव्हर्ड सिगारेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्याला चक्क त्याचे व्यसनच लागले. मात्र, त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुलाला चक्कर आली व त्याचे हातपाय कडक झाले. वरुणने तातडीने त्याच्या आईला फोन करून त्याला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, इतके झाल्यावरही त्याने सिगारेटबाबत कुठलीही माहिती घरच्यांना दिली नाही.

असा झाला भंडाफोड

काही दिवसांअगोदर विद्यार्थ्याच्या शाळेतून फोन आला व त्याच्या पालकांना बोलावण्यात आले. विद्यार्थी शाळेच्या स्वच्छतागृहात ई-सिगारेट ओढताना सुरक्षारक्षकाला आढळला होता व त्यानंतर हा प्रकार शिक्षक व मुख्याध्यापकांना समजला. विद्यार्थ्याच्या पालकांना जेव्हा झाला प्रकार सांगण्यात आला ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलाला दरडावून विचारणा केली असता त्याने सर्व प्रकार त्यांना सांगितला.

आरोपी आणखी विद्यार्थ्यांना विकणार होता ई-सिगारेट

आरोपी वरुणने आणखी काही विद्यार्थ्यांनादेखील ई-सिगारेटची सवय लावण्याचा प्रयत्न केला होता. एका विद्यार्थ्याला सिगारेटसाठी पैशांची मागणी केल्याचे पीडित विद्यार्थ्याने सांगितले. वरुणला शाळेत बोलावण्यात आले असता त्याने अखेर सर्व प्रकार कबूल केला.

विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage! Nagpur Van Driver Introduces Sixth Grader to E-Cigarette Addiction

Web Summary : A Nagpur van driver addicted a sixth-grade student to e-cigarettes. The boy stole money, became ill, and was caught at school. Police arrested the driver after parents complained. He also tried to give e-cigarettes to other students.
टॅग्स :CigaretteसिगारेटCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस