शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

संघात होणार संघटनात्मक बदल

By admin | Updated: March 12, 2015 02:34 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार १३ मार्चपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार १३ मार्चपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात होणाऱ्या या सभेत संघाच्या सरकार्यवाहांसोबतच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. संघात नेमके काय संघटनात्मक बदल होतात याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे हे विशेष.संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदाच्या सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासमवेत सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्ताजी होसबळे यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच संघ परिवाराच्या विविध संघटनांचे देशभरातील सुमारे १४०० प्रतिनिधी या सभेत सहभागी होणार आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रतिनिधी, क्षेत्रीय प्रचारक, माजी प्रांत प्रचारक, सहा सेवा विभागांचे प्रांत प्रमुख, प्रांतस्तराचे कार्यकर्ते, निवडक प्रतिनिधी आणि संघाच्या इतर संघटनांच्या ३०-३५ प्रतिनिधींचा समावेश आहे. समन्वयावर मंथन होणारनागपूर : प्रतिनिधी सभेसाठी प्रतिनिधी नागपुरात पोहोचलेदेखील आहेत. संघाच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत या सभेत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहेत. निवड प्रक्रियेसोबतच या तीन दिवसीय सभेत संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शिवाय संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरिता मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भय्याजी जोशी की होसबळे?या सभेत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती करण्यात येते याकडे लक्ष लागले आहे. २०१२ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. लोकसभा निवडणूकांत दोघांनीही संघातर्फे मोलाची भूमिका पार पाडली होती. गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि राजकारणात वाढलेली सक्रियता यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांपैकी एकाला केंद्र आणि संघामध्ये समन्वयकाची महत्त्वाची जबाबदारीदेखील देण्यात येऊ शकते, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)