शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पहिल्यांदाच दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान; चार रुग्णांना मिळाले नवे जीवन 

By सुमेध वाघमार | Updated: December 16, 2023 19:00 IST

विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) नागपूरअंतर्गत पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयवदान झाले.

नागपूर : विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) नागपूरअंतर्गत पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयवदान झाले. गोडे व शर्मा कुटुंबियांचा पुढाकारामुळे चार रुग्णांना नवे जीवन मिळाले. पहिल्या अवयवदात्याचे नाव कमलकांत गोडे (६०) रा. आयुर्वेदीक कॉलनी सक्करदरा तर दुसऱ्या अवयवदात्याचे नाव मदन प्रसाद शर्मा (६६). रा. आशियाना नगर पाटणा बिहार असे आहे. ‘झेडटीसीसी’ने दिलेल्या माहितीनुसार कमलकांत गोडे हे खासगी व्यवसायीक होते. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती खालवली. त्यांना लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. 

तीन दिवस उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालवत गेली. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषीत केले. हॉस्पिटलचे डॉ. अश्विनी चौधरी आणि पल्लवी जवादे यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. कमलकांत यांच्या पत्नी रेखा, मुलगा अंकित आणि भूषण यांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर ‘झेडटीसीसी’ला ही माहिती देण्यात आली. ‘झेडटीसीसी’ने प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. न्यू इरा हॉस्पिटलमधील ४९ वर्षीय महिलेला यकृताचे दान करण्यात आले. याच हॉस्पिटलच्या ६२वर्षीय एका पुरुष रुग्णाला पहिले मूत्रपिंड तर दुसरे मूत्रपिंड ४६ वर्षीय एका महिलेला दान करण्यात आले. 

बिहारामधील व्यक्तीचे नागपुरात अवयवदान किडनीवरील उपचारासाठी मदन शर्मा हे बिहारहून नागपुरात आले होते. किम्स किंग्जवे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांची अचानक प्रकृती खालवली. त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषित केले. हॉस्पिटलच्या समन्वयक शालिनी पाटील यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. शर्मा यांच्या पत्नी मंजू देवी आणि मुलगा एकलव्य यांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) ही माहिती देण्यात आली. समितीने प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. शर्मा यांना किडनीचा आजार असल्याने यकृताचे दान झाले. न्यू इरा हॉस्पिटलमधील ३९वर्षीय पुरुषाला या अवयवाचे दान करण्यात आले. बिहारमधील व्यक्तीचे नागपुरात अवयवदान झाले.

२४ तासांत चार रुग्णांमध्ये अवयवाचे प्रत्यारोपण‘झेडटीसीसी’ नागपूर अंतर्गत पहिल्यांदाच २४ तासांत दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान झाले. विशेष म्हणजे, याच कालावधीत दोन रुग्णांवर मूत्रपिंड व दोन रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होण्याचीही पहिलीच घटना आहे. अवयवदानासाठी नातेवाइक पुढे येत असल्याने अवयवदान चळवळीला गती येण्याची शक्यता आहे. -डॉ. संजय कोलते, अध्यक्ष झेडटीसीसी नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर