शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

निडोजमधील आॅर्केस्ट्रावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:31 IST

धंतोली पोलिसांनी निडोज बारवर धाड टाकून डान्स बार सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे.

परवाना रद्द होणार : २० दिवसांत पाचव्यांदा कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धंतोली पोलिसांनी निडोज बारवर धाड टाकून डान्स बार सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे. निडोज बारविरुद्ध २० दिवसात पाचव्यांदा कारवाई करण्यात आली असून पोलिसांकडून बारचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० जूनला निडोज बारवर धाड टाकून २.५० लाखाची दारू जप्त केली होती. दारूबंदीविरोधी कायद्यानुसार कारवाई करून बारचे मालक राजू जायसवालला अटक करण्यात आली होती. यामुळे निडोज बार चर्चेत आला होता. त्यानंतर १ जुलैला चालानची कारवाई करण्यात आली. त्यानंतर १५ जुलैला दोनदा चालानची कारवाई करण्यात आली. धंतोली पोलिसांनी चालानची कारवाई केल्यानंतरही निडोजमध्ये आॅर्केस्ट्रा चालविण्यात येत असल्याचे समजल्यामुळे मंगळवारी रात्री ११.४५ वाजता धंतोली पोलिसांनी धाड टाकली. यावेळी तेथे आॅर्केस्ट्रा सुरू होता. आॅर्केस्ट्रासाठी परफॉर्मन्स लायसन्स गरजेचे आहे. धंतोली पोलिसांनुसार जायसवालच्या परफॉर्मन्स लायसन्सची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये संपली आहे. अशा परिस्थितीत तेथे आॅर्केस्ट्रा चालविता येत नाही. त्यामुळे मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. २० दिवसांत पाचव्यांदा कारवाई झाल्यामुळे निडोजच्या विरुद्ध परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना अवैध दारूच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही विभागांना त्यात अपयश येत आहे. शहरात छुप्या पद्धतीने अनेक बारमध्ये दारूची विक्री होत आहे. अवैध दारूचे अड्डेही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी बार आणि हुक्का पार्लरवर धाडी टाकून खळबळ उडविली होती. त्यानंतर गुन्हे शाखा आणि इतर उपायुक्तांनी कारवाईस सुरुवात केली. पोलीस आयुक्तांनीही दारू आणि हुक्का पार्लरवर अंकुश लावण्याचे निर्देश दिले. हुक्का पार्लरच्या संचालकांना व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले. निडोजच्या कारवाईसंदर्भात धंतोलीच्या निरीक्षक सीमा मेहंदाळे यांनी सांगितले की, परफॉर्मन्स लायसन्सअभावी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. निडोजची पार्श्वभूमी पाहून कारवाई सुरू करण्यात आली आहे.