शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथी डॉक्टरांच्या अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीसला विरोध

By admin | Updated: April 27, 2015 02:22 IST

मी होमिओपॅथीचा कट्टर समर्थक आहे. पण होमिओपॅथी डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याला माझा विरोध आहे.

नागपूर: मी होमिओपॅथीचा कट्टर समर्थक आहे. पण होमिओपॅथी डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याला माझा विरोध आहे. या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीच्या मागे न लागता होमिओपॅथीलाच अधिक भक्कम करण्यासाठी संशोधनावर भर द्यावा,असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.होमिओपॅथी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन आॅफ इंडियातर्फे (हीम्पाम) येथील हिंदी मोर भवनमध्ये होमिओपॅथिक चिकित्सकांचा विदर्भस्तरीय मेळावा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात ते ते बोलत होते. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दादासाहेब कविश्वर, डॉ. बाहुबली शहा, डॉ. अरुणकुमार भस्मे, हिम्पासचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश झामड डॉ. शांतीलाल देसरडा, डॉ. डी.बी.चौधरी, डॉ. रवींद्र भोसले, डॉ. शिवदास भोसले, डॉ. कांचन देसरडा, डॉ. रवींद्र पारख उपस्थित होते.यावेळी ‘फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमासंदर्भात शासकीय, विद्यापीठस्तरावर कार्यवाही’, ‘भारताच्या आरोग्य सेवेच्या भवितव्यासाठी सर्वसमावेशक चिकित्सा पदधतीत व वैद्यकीय सेवा आणि शिक्षण यात सुधारण्याची गरज’ या विषयावर चर्चासत्र झाले.सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावरील सर्वच वक्त्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याचे समर्थन केले आणि याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. हाच मुद्दा मेळाव्याच्या केंद्रस्थानी होता. मात्र कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सभागृहात आलेल्या गडकरी यांनी या मुद्याला विरोध दर्शविला. ते म्हणाले की, मी स्वत: होमिओपॅथीचा कट्टर समर्थक आहे. औषधही होमिओपॅथीचेच घेतो. पण या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास माझा विरोध आहे. डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीच्या मागे लागणे म्हणजे होमिओपॅथीवरच अविश्वास दाखविण्यासारखे आहे. ज्यांच्या आपल्या पॅथीवरच विश्वास नाही ते चांगली प्रॅक्टीस करू शकत नाही. होमिओपॅथीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची शक्ती आहे हे वेळोवेळी सिद्ध सुद्धा झाले आहे. त्यामुळे या पॅथीवर विश्वास ठेवून अ‍ॅलोपॅथीच्या मागे धावू नका.होमिओपॅथीमध्ये संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून संशोधन केल्यास रुग्णांना आणि या क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल. त्यादृष्टीने डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असे गडकरी म्हणाले.राज्यात या पॅथीची ४८ महाविद्यालये असून ती खासगी आहेत. सरकारी कॉलेज असावे अशी मागणी आहे. यालाही माझा विरोध आहे. सरकारी महाविद्यालयांची अवस्था कशी होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या पॅथीच्या विकासासाठी आणखी खासगी महाविद्यालये सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान नागपूरमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरू करावे, एम्समध्ये होमिओपॅथीसाठी ओपीडी सुरू करा आणि नॅशनल होमिओपॅथी संशोधन केंद्र नागपूरमध्ये सुरू करा, आदी मागण्या करण्यात आल्या व त्याचे निवेदन गडकरी यांना देण्यात आले. यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुभाष राऊत, डॉ. राजेश रथकंटीवार आणि डॉ. मनीष पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)