शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी!

By admin | Updated: April 29, 2015 02:42 IST

लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही.

नागपूर : लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. सोन्याचा भाव किती खाली जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. सोन्याची ही चमक धोकाही देऊ शकते. आगामी काळात सोने भाव खाणार, यात शंका नाही. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वाट पाहू नये. सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव उतरल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारे व्यापारी आणि सट्टेबाज यांचे त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. अक्षयतृतीयेपासून बाजारात प्रचंड गर्दी आहे. ग्राहकच नव्हे तर तोटा भरून काढण्यासाठी व्यापारीही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये मध्यमवर्गीय व गृहिणींचे प्रमाण लक्षणीय आहे. सोन्याचे भाव उतरल्याने दागिन्यांची हौस पुरी करण्यासाठी खरेदी वाढल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात व्यवसायावर परिणामभारतात होणारी सुमारे ७५ टक्के सोने खरेदी ही दागिन्यांच्या रूपात असते. त्यातही ५० टक्क्यांहून अधिक खरेदी ही गुंतवणुकीच्या उद्देशापोटीच केली जाते. भारताच्या बाबतीत लक्षात आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतात होणाऱ्या सोने खरेदीतील ७० टक्के वाटा हा ग्रामीण भारताचा असतो. पण यावर्षी पावसाचा पिकांना फटका बसला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात सराफा व्यवसायावर पडल्याचे सोने-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कावळे म्हणाले, भारतीय व्यक्ती सोन्याच्या दागिन्यांकडे ते परिधान करण्याबरोबरच गुंतवणूक म्हणूनही पाहत असते. दागिन्यांची खरेदी ही काही केवळ अंगावर घालण्यासाठी किंवा केवळ मिरवण्यासाठी होत नाही. (प्रतिनिधी)