बनावट चाबीने फ्लॅट उघडून, २.५८ लाखांचा मुद्देमाल नेला चोरून
By दयानंद पाईकराव | Updated: February 3, 2024 16:44 IST2024-02-03T16:43:21+5:302024-02-03T16:44:03+5:30
दोन फ्लॅटचे कुलुप तोडून ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरुन नेला.

बनावट चाबीने फ्लॅट उघडून, २.५८ लाखांचा मुद्देमाल नेला चोरून
दयानंद पाईकराव,नागपूर : दोन फ्लॅटचे कुलुप तोडून ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरुन नेला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ जानेवारीला सायंकाळी ६ ते २ फेब्रुवारीला सकाळी ९.४५ दरम्यान घडली. सुनिता वामनराव केवटे (५४, रा. तिरुपती अपार्टमेंट, तिसरा माळा, ओमकारनगर) या आपल्या फ्लॅटला कुलुप लाऊन अहमदनगर येथे गेल्या होत्या.
अज्ञात आरोपीने त्यांच्या फ्लॅटचे डुप्लीकेट चाबीने कुलुप उघडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आरोपीने सोन्याचे दागीने किंमत २.४९ लाख रुपये चोरून नेले. तसेच आरोपीने शेजारील फ्लॅट नं. ३०३ मध्ये राहणारे प्रिंस प्रमोद गायकवाड यांच्या फ्लॅटमधील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ७० हजार असा १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. दोन्ही घटनात आरोपीने ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.