नागपूर-सोलापूर शिवशाही एसी स्लिपर बसचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:04 IST2018-09-26T23:02:43+5:302018-09-26T23:04:21+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी बुधवारपासून नागपूर-सोलापूर-नागपूर शिवशाही वातानुकुलित स्लिपर बससेवा सुरु केली आहे.

नागपूर-सोलापूर शिवशाही एसी स्लिपर बसचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी बुधवारपासून नागपूर-सोलापूर-नागपूर शिवशाही वातानुकुलित स्लिपर बससेवा सुरु केली आहे.
प्रवाशांना दैनंदिन वाहतूक सेवा देत असताना खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आणि प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत नागपूर-सोलापूर-नागपूर शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेची सुरुवात बुधवार २६ सप्टेबरपासून केली आहे. ही बस गणेशपेठ बसस्थानकावरून दुपारी ४ वाजता सुटणार असून सोलापूरला सकाळी ६.३५ वाजता पोहोचेल. सोलापूरवरून ही बस दुपारी ३ वाजता सुटून नागपूरला सकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. सदर शिवशाही बसचा मार्ग नागपूर, यवतमाळ, पुसद, नांदेड, सोलापूर असा राहील. प्रवाशांसाठी शिवशाही, शिवनेरी, वातानुकूलित व इतर प्रवासी बसेस सोबतच शिवशाही स्लिपर बसचे आरक्षण महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे. सदर बसच्या शुभारंभ प्रसंगी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे, बसस्थानक प्रमुख राजेश रामटेके यांनी बसमधील प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रवाशांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या शिवशाही बसमध्ये आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही कॅमेरा, अनाऊन्समेंट सिस्टीम असून प्रवाशांना आरामदायी व सुखकर प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. या शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.