मुक्त विद्यापीठाच्या कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू
By Admin | Updated: June 4, 2014 01:11 IST2014-06-04T01:11:30+5:302014-06-04T01:11:30+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेच्या वतीने विविध कृषी अभ्यासक्रम चालविले जातात. याअंतर्गत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यातील

मुक्त विद्यापीठाच्या कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू
नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेच्या वतीने विविध कृषी अभ्यासक्रम चालविले जातात. याअंतर्गत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यातील ५७ कृषी शिक्षण केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.
उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता, फळबागा उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका, फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका आणि माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांचे प्रवेश १४ जून २0१४ अखेरपर्यंंंंत चालू राहणार आहे.
कृषी शिक्षणक्रम माहितीपुस्तिका व प्रवेश अर्ज, कृषी शिक्षणक्रम प्रथम प्रवेश अर्ज, अंतिम प्रवेश अर्ज, कृषी शिक्षणक्रम माहितीपुस्तिका आणि प्रपत्र व अर्ज मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी प्रवेश परीक्षा २९ जून रोजी
मुक्त विद्यापीठातर्फे चालविण्यात येणार्या कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी २९ जून रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जून ही आहे असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित केलेल्या कालावधीत नजीकच्या कृषी शिक्षण केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)