शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

काॅलमच्या उघड्या सळाकी धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : माैदा तालुक्यातील बाेरगाव-काेदामेंढी मार्गावरील रेवराल येथे रेल्वेच्या ओव्हरब्रिजचे काम हाती घेण्यात आले ...

चक्रधर गभणे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : माैदा तालुक्यातील बाेरगाव-काेदामेंढी मार्गावरील रेवराल येथे रेल्वेच्या ओव्हरब्रिजचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या काॅलमसाठी दाेनदा खड्डे तयार करण्यात आले असून, त्या काॅलमच्या कामात आधी वापर केलेल्या सळाकींचा पुन्हा वापर केला आहे. एवढेच नव्हे, तर काॅलमचे खड्डे खाेल असून, त्यातील उघड्या व उंच सळाकी धाेकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही उपाययाेजना केल्या नाहीत. या गंभीर प्रकाराकडे कंत्राटदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

बाेरगाव-काेदामेंढी हा मार्ग वर्दळीचा असून, या मार्गावर रेवराल येथे रेल्वे फाटक आहे. या फाटकाजवळ वाहतुकीची काेंडी हाेत असल्याने, ही समस्या साेडविण्यासाठी प्रशासनाने येथे ओव्हरब्रिज तयार करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली. या कामाचे कंत्राट पल्लवी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहेत. कंपनीने या ठिकाणी ओव्हरब्रिजच्या निर्मितीसाठी काॅलम तयार करायला सुरुवात केली. काॅलमसाठी ड्रिल मशीनच्या मदतीने खाेेदकाम केले.

या काॅलमचे काम अर्धेअधिक पूर्ण झाल्यानंतर ते नामंजूर करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने जुने बांधकाम ताेडून ड्रिल मशीनने नव्याने खड्डे तयार करण्यात आले. याच नवीन खड्ड्यांमध्ये पुन्हा काॅलमचे बांधकाम करण्यात आले. या कामात ज्या सळाकी वापरण्यात आल्या, त्या आधीच्या काॅलममध्ये वापरण्यात आल्या हाेत्या. ते काॅलम ताेडून त्यातील सळाकी काढण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली असून, त्यामुळे काॅलमच्या मजबुतीकरणावर परिणाम हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या बाबी धाेकादायक ठरत असल्याने, स्थानिक व परिसरातील नागरिकांनी याबाबत कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देत, बांधकामाच्या ठिकाणी याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी केली, परंतु कंपनी अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ही समस्या साेडविण्याची मागणी या भागातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

....

खड्ड्यांमध्ये पाणी

काॅलमच्या निर्मितीसाठी या ठिकाणी चार खड्डे माेठे व खाेल तयार करण्यात आले आहेत. त्या खड्ड्यांमधील लाेखंडी सळाकी उघड्या असून, त्यात पाणी भरून ठेवले आहे. या खड्ड्यांलगत रहदारी व नागरिकांसह गुरांची वर्दळ असते. आत पाणी दिसत असल्याने तहानलेली जनावरे पाणी पिण्यासाठी खड्ड्यात पडण्याची, तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालक अथवा पादचारी त्या खड्ड्यांमध्ये काेसळून जखमी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ठिकाणी कंत्राटदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही उपाययाेजना केल्या नाहीत.

...

खड्ड्यातील गाळ रस्त्यावर

खड्डे ड्रिल मशीनने तयार करण्यात आले असून, ते तयार करण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे खड्ड्यांमधून माेठ्या प्रमाणात गाळ व चिखल निघाला असून, कंत्राटदार कंपनीने त्याचीही याेग्य विल्हेवाट लावली नाही. त्यांनी यातील काही गाळ रस्त्यावर टाकला, तर काही राेडलगतच्या नालीत टाकला. या गाळामुळे वाहने घसरत असून, अपघात हाेण्याची व वाहने घसरत त्या खड्ड्यांमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.