शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

नागपूरच्या मेडिकलचे ओपीडीचे शुल्क २० रुपये : गरीब रुग्णांच्या खिशाला खार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 8:36 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे आता गरिबांचे रुग्णालय राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आंतररुग्ण विभागाचे (आयपीडी) शुल्क १० वरून २० रुपये करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशुल्काची मुदत सात दिवसांची तरीही द्यावे लागत आहे शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे आता गरिबांचे रुग्णालय राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आंतररुग्ण विभागाचे (आयपीडी) शुल्क १० वरून २० रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकदा हे शुल्क भरल्यास व सात दिवसांच्या आत त्याच विभागात तपासणीसाठी रुग्णाला जावे लागल्यास पुन्हा शुल्क न आकारण्याचा नियम आहे. परंतु मेडिकलमध्ये काही विभागात या नियमाचे उल्लंघन होत असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे.गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी तयार झालेल्या राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) खरंच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय, हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. या रुग्णालयासाठी तयार करण्यात आलेल्या योजना आज कुठे आहेत याचा शोध घ्यावा अशी परिस्थिती आहे. गेल्या सहा महिन्यांपासून औषधांच्या खरेदीसाठी आवश्यक असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून पाच महिन्यावर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे औषध पुरवठादारांची ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पुरवठादाराने औषधे देणे बंद केले आहे. परिणामी औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयात आवश्यक औषधांसह जीवनरक्षक औषधे नाहीत. अपघातामधील जखमीना कित्येक तास उपचार मिळत नाहीत. औषधांचा खर्च रु ग्णाच्या नातेवाईकांनाच करावा लागतो. डॉक्टर्सच्या अपुऱ्या  संख्येमुळे तातडीची आॅपरेशने करायला आठवड्याच्या वर कालावधी लागतो. सफाई कर्मचाºयांच्या तोकड्या संख्येमुळे स्वच्छतागृहे कुलपात बंद आहे. निसर्गासाठीच्या सुविधा, साधने यांची भीषण कमतरता आहे. राज्यभरातील मेडिकल रुग्णालयांची कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. असे असताना, वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकलमधील शुल्कात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे, यावर पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढीव शुल्काचा फलकही नाहीनागपूर मेडिकलमध्ये ‘ओपीडी’ व ‘आयपीडी’चे शुल्क वाढले. परंतु प्रशासनाने या संदर्भातील कुठेही फलक लावलेला नाही. शुल्क आकारणाऱ्या  खिडक्यांवरही या संदर्भातील फलक न लावताच वाढीव शुल्क आकारले जात आहे. यामुळे कालपर्यंत १० रुपये शुल्क आकारले जात असताना कर्मचाऱ्याकडून २० रुपयांच्या मागणीला घेऊन खटके उडत आहे.काही कर्मचारी कमवितात रोजचे १००-२०० रुपयेमेडिकलमध्ये शुल्क संदर्भातील माहिती देणारे फलक नाही. यामुळे याचा फायदा शुल्क आकारणारे कर्मचारी घेत असल्याचे चित्र आहे. मेडिकलच्या ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टिम’ (एचआयएमएस) कडे शुल्क आकारण्याची जबाबदारी दिली आहे. नियमानुसार एकाच विभागात सात दिवसांच्या आत तपासणीसाठी रुग्ण गेल्यास त्याच्याकडून शुल्क आकारू नये, असा नियम आहे. यासाठी रुग्णाच्या जुन्या तिकिटावर नवीन तारखेचा स्टॅम्प मारून घ्यावा लागतो. परंतु यासाठीही काही कर्मचारी पैस मागत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सूत्रानुसार, काही कर्मचारी रोज गरीब रुग्णांकडून १०० ते २०० रुपये कमवित आहे.पुढील आठवड्यापासून एक्स-रे, एमआरआय महागणारमेडिकलमध्ये ओपीडी व आयपीडीच्या शुल्कात वाढ केली असली तरी इतर शुल्कातील वाढ १५ जानेवारीनंतर होण्याची शक्यता आहे. यामुळे रक्ततपासणीपासून ते एक्स-रे, एमआरआय, ईसीजी, सोनोग्राफी, आहारशुल्क, दुसऱ्यांदा प्रसूती, विविध उपचार पद्धती, शस्त्रक्रिया यात साधारण २५ टक्के वाढ होणार आहे.मेयोमध्ये १५ जानेवारीपासून वाढमेडिकलच्या पाठोपाठ इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १५ जानेवारीपासून शुल्कात वाढ होणार आहे. परंतु त्या पूर्वी शुल्क आकारणीच्या ठिकाणी व ओपीडी, आयपीडी या भागात सुधारित दर फलक लावण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांनी दिली.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर