शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पंचशील ध्वजांनी सजली अवघी दीक्षाभूमी; भव्य धम्ममंच, आकर्षक रोषणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 18:55 IST

Nagpur News माणसा-माणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी आभामय झाली आहे.

ठळक मुद्देनिळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीकडे

नागपूर : ज्या भूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले. ती दीक्षाभूमी ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजली आहे. माणसा-माणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी आभामय झाली आहे. ३ ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी ओसंडून वाहणाऱ्या जनसागराच्या सोयींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी उभारण्यात येणारे भव्य धम्ममंच, पंचशिलाचे झेंडे व आकर्षक रोषणाईच्या कामासाठी आंबेडकरी चळवळीतीलच कार्यकर्ते सतत झटत आहेत. राज्यासह देशभरातील निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीकडे येत आहेत.

जागोजागी धम्मध्वज

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी ही निळ्या पाखरांनी आणि धम्म ध्वजांनी सजते. या वर्षीही जागोजागी धम्मध्वज लावण्यात आले आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशिलेला अनुसरून असलेला, हा पंचशील ध्वज स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर, स्तुपाच्या सभोवताल व परिसरात जागोजागी उभारले आहे.

२४ तास पिण्याचे पाणी

दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी महानगर पालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कायमस्वरूपी नळांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार स्टँडपोस्ट, टँकर व पीव्हीसी टँक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सफाईची जबाबदारी ९०० कर्मचाऱ्यांवर

८ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे या दरम्यान महापालिकेतर्फे साफसफाईसाठी प्रत्येक शिफ्टला ३०० सफाई कामगारांची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरूपाची शौचालय व स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी व महानगर पालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याचे कार्यही सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येणार आहेत.

आरोग्याची विशेष काळजी

दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध वैद्यकीय संघटनांनी घेतली आहे. माता कचेरी परिसरात (हेल्थ झोन) तात्पुरते आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहे. महानगर पालिका, आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने हे झोन काम करेल. मेडिकल, मेयो व खासगी इस्पितळांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDasaraदसरा