देशाबाहेर काढणार, ही केवळ अफवा : स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:54 IST2020-01-25T23:53:11+5:302020-01-25T23:54:50+5:30

अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले.

Only rumor that will be out of the country: Smita Gaikwad | देशाबाहेर काढणार, ही केवळ अफवा : स्मिता गायकवाड

देशाबाहेर काढणार, ही केवळ अफवा : स्मिता गायकवाड

ठळक मुद्दे‘सीएए’बद्दल गैरसमज

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लोकशाहीत विरोध प्रदर्शन आणि मोर्चा काढण्याचे नागरिकांना अधिकार आहेत. पण नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशात काढण्यात येणाऱ्या मोर्चात काही हिंसक प्रवृत्तीचे लोक घुसून मोर्चाला गालबोट लावत आहेत. अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले.
‘युवा आयाम’तर्फे ‘सीएए हिंसा : प्रदर्शन वा नक्षली षङ्यंत्र’ या विषयावर ‘मंथन टॉक’चे आयोजन गोरेवाडा रोड, गिट्टीखदान येथील कल्पतरू सभागृहात शनिवारी करण्यात आले. मुख्य वक्त्या स्मिता गायकवाड म्हणाल्या, ‘सीएए’ विरोधात देशभरात सुनियोजित हिंसा पसरविण्यात येत आहे. मोर्चात जाळपोळ करणारे शहरी नक्षलवादी असल्याचे सत्य पुढे आले आहे. अल्पसंख्यक ७० वर्षांपासून देशात राहात आहेत. त्यांना देशाबाहेर काढणार असल्याची भीती दाखविणे चुकीचे आहे. नागरिकत्व कायदा १९५५ ला झाला. राष्ट्रीयता आणि नागरिकत्व यात फरक असून तो समजून घेण्याची लोकांना गरज आहे. आर्टिकल १५ भारतीय नागरिकांसाठी लागू आहे. कायदा पटत नसेल तर लोकांनी न्यायालयात जावे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
गायकवाड म्हणाल्या, सीएएबद्दल अफवा हीच मूळ समस्या आहे. मोर्चातील बहुतांश लोकांना सीएए काय, हेच माहीत नाही. खरं तर सीएए नागरिकत्व मागण्याचा कायदा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला आहे. त्याला लोक आसामच्या एनआरसीसोबत जोडून चूक करीत आहेत. शहरी नक्षलवादी मोर्चात घुसून आपला हेतू साध्य करीत आहे. हे लोकांनी समजून घ्यावे.
यावेळी युवा आयामचे आकाश प्रसाद, मानस मलय, अमन पांडे, जयकृष्ण पिल्लई उपस्थित होते.

Web Title: Only rumor that will be out of the country: Smita Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.