शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बजेटमध्ये फक्त घोषणा प्रत्यक्षात कृती नाही

By admin | Updated: June 28, 2014 02:41 IST

दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवून सादर केला जातो. यात नवनवीन योजना मांडून नागपूरकरांना विकासाचे स्वप्न दाखविले जाते.

नागपूर : दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प फुगवून सादर केला जातो. यात नवनवीन योजना मांडून नागपूरकरांना विकासाचे स्वप्न दाखविले जाते. प्रत्यक्षात अर्थसंकल्प कृतीत उतरतच नाही. गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पात केलेल्या १० टक्केही घोषणा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे सत्ताधारी फसवा अर्थसंकल्प कशासाठी सादर करतात, जनतेला उल्लू का बनवतात, असा सवाल राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील यांना पत्रकार परिषदेत केला.१ जुलै रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होत आहे. याबाबत पाटील म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांनी बीओटी तत्त्वावर अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली होती. एकही हॉस्पिटल उभारले नाही. आहे त्या दवाखान्यांकडे दुर्लक्ष केले. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल शॉप सुरू केले जाणार होते. प्रत्यक्षात झाले नाही. युवा जीवन सुरक्षा प्रकल्प, बाल आरोग्य सुधार प्रकल्प सुरूच झाले नाहीत. एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या नाल्यांची सफाई झालेली नाही. १ लाख कामगारांचे लसीकरण झाले नाही. अ‍ॅन्टी रॅबीज व्हॅक्सीनचा तुटवडा आहे. नवजात बालकांना मोफत औषधोपचार मिळत नाही. दंतचिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी नबिदाद संस्थेला कार्यादेश दिले पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. महापालिकेच्या शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी होत नाही. प्रभाग तिथे व्हॉलिबॉल मैदान उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात आहे त्या मैदानांवर अतिक्रमण होत आहे. बंद पडलेल्या शाळा नामवंत संस्थाना सीबीएसई पॅटर्ननुसार चालविण्यासाठी देण्याची योजना आखली. पण ती योजना फाईलमध्येच बंद आहे. अपंगांसाठी केलेल्या घोषणांचीही अंमलबजावणी झाली नाही. शहरात फवारणीसाठी फॉगिंग मशीन नाही. जनावरांचे गोठे अद्याप हटविलेले नाहीत. न झेपणाऱ्या घोषणा सत्ताधारी कशासाठी करतात, असा सवाल करीत जनतेची दिशाभूल करणे थांबविण्याचा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)