वज्रमूठ सभेअगोदर पंतप्रधान मोदींची नागपुरात ऑनलाईन उपस्थिती

By योगेश पांडे | Updated: April 8, 2023 10:09 IST2023-04-08T10:08:22+5:302023-04-08T10:09:01+5:30

महाविकास आघाडी तर्फे आयोजित वज्रमूठ सभेवरून राजकारण तापले असताना मोदी यांच्या व्हर्चुअल कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Online presence of Prime Minister Narendra Modi in Nagpur before the Vajramooth rally of MVA | वज्रमूठ सभेअगोदर पंतप्रधान मोदींची नागपुरात ऑनलाईन उपस्थिती

वज्रमूठ सभेअगोदर पंतप्रधान मोदींची नागपुरात ऑनलाईन उपस्थिती

नागपूर : शांतीवन चिंचोली येथील प्रकल्पाच्या कार्यक्रमाला १३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासोबतच इतर इमारतींचे उद्घाटन होईल. महाविकास आघाडी तर्फे आयोजित वज्रमूठ सभेवरून राजकारण तापले असताना मोदी यांच्या व्हर्चुअल कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान या महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला नागपूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लक्षात घेता १३ एप्रिल रोजी शांतीवन चिचोली येथील प्रकल्पाचे उदघाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान याला ऑनलाईन उपस्थित राहतील. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला.
 

Web Title: Online presence of Prime Minister Narendra Modi in Nagpur before the Vajramooth rally of MVA