रस्त्यावरच आयपीएलची ऑनलाईन सट्टेबाजी, आरोपीला अटक
By योगेश पांडे | Updated: April 9, 2024 17:46 IST2024-04-09T17:46:09+5:302024-04-09T17:46:25+5:30
गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

रस्त्यावरच आयपीएलची ऑनलाईन सट्टेबाजी, आरोपीला अटक
नागपूर : आयपीएलमधील चेन्नई सूपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपी रस्त्याच्या कडेला उभा राहूनच खायवाडी करत होता. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्तीवर असताना पडोळे इस्पितळ चौकाजवळ रिंग रोडवर एक तरुण ऑनलाईन सट्टेबाजी करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अक्षय सुधाकर कोडवते (२७, गोपालनगर) याला ताब्यात घेतले. तो मोबाईलमधून सट्ट्याची ऑनलाईन खायवाडी करताना आढळला. त्याच्या ताब्यातून मोबाईल व रोख दोन हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.