शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

बँकांमध्ये ३६ हजार कोटींची एक लाख ७९ फसवणुकीची प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:17 IST

रिझर्व्ह बँकेने माहिती केली उघड : आर्थिक वर्ष २०२४-२५

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील विविध बँकांमध्ये ३६,३६१ कोटी रुपयांची १.७९ लाख फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. अभय कोलारकर यांनी माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत दाखल केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने उघड केली. त्यांना प्राप्त माहितीत फसवणुकीची संख्या आणि त्यात समाविष्ट असलेल्या रकमेचा बँकनिहाय आढावा देण्यात आला. ही आकडेवारी भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील असुरक्षितता दर्शविते. आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी कठोर नियामक देखरेख आणि बँकांचे रिअल-टाइम ऑडिट करण्याची आवश्यक असल्याचे कोलारकर म्हणाले.

गत आर्थिक वर्षात देशातील आघाडीच्या बँकांमध्ये अॅक्सिस बँकेत ७९,६२९ प्रकरणांमध्ये ९८६.४६ कोटींची फसवणूक झाली. एचडीएफसी बैंक लिमिटेडमध्ये ३९,८२२ प्रकरणांमध्ये ७१५.९६ कोटी, एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड १९,८३८ प्रकरणांमध्ये ७५.२६ कोटी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड १३,५३२ प्रकरणे ६०८.९४ कोटी आणि आरबीएल बैंक लिमिटेड ८,६१० प्रकरणांमध्ये ६८.२७ कोटींची फसवणूक झाल्याची नोंद आहे.

आघाडीच्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) १३,८३५ प्रकरणांमध्ये ७,७००.४४ कोटी, आयडीबीआय बँक लिमिटेड ४३० प्रकरणे ६,१२९.५७ कोटी, कॅनरा बँक ५४२ प्रकरणे ४,९५१.६९ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया २८० प्रकरणे ३,७८२.९७ कोटी, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) २,९७९ प्रकरणे ३,७८२.९७कोटी, इंडियन बँक २,१७१ प्रकरणे २,११४.११ कोटी आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २९२ प्रकरणांमध्ये ९४२.४३ कोटींची फसवणूक झाली.

याशिवाय बँक ऑफ इंडियामध्ये १५३ प्रकरणांमध्ये ७,४४९.३६ कोटी, येस बँक २,८१४ प्रकरणांमध्ये ३८८.०२ कोटी, कर्नाटक बँक २२१ प्रकरणांमध्ये ३४८.९४ कोटी, फेडरल बँक ३,८०३ प्रकरणांमध्ये ७९.७५ कोटी आणि जम्मू आणि काश्मीर बँकेत ३५ प्रकरणांमध्ये १९८.१७ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. ही आर्थिक फसवणूक निश्चित कोणत्या तारखेला झाली, याची माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. परंतु, ही फसवणूक गेल्या आर्थिक वर्षांत झाली. या आर्थिक घोटाळ्यावर सर्व स्तरांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMONEYपैसा