नागपुरात घर कोसळून एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 10:38 IST2020-08-24T10:37:48+5:302020-08-24T10:38:10+5:30

सदर भागातील आझाद चौक येथे राहणाऱ्या अशोक टेकसुल्तान यांचे घर सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळले. या ठिकाणी तीन कुटुंबे राहत होती. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी आहेत.

One killed, four injured in house collapse in Nagpur | नागपुरात घर कोसळून एक ठार, चार जखमी

नागपुरात घर कोसळून एक ठार, चार जखमी

ठळक मुद्देपहाटे कोसळले घर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सदर भागातील आझाद चौक येथे राहणाऱ्या अशोक टेकसुल्तान यांचे घर सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळले. या ठिकाणी तीन कुटुंबे राहत होती. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी आहेत.
सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास हे घर अचानक कोसळले. घर पडत असल्याची जाणीव होताच घरातील मंडळी बाहेरच्या दिशेने धावले. मात्र काहीजण ढिगाºयाखाली दबले गेले. येथील नगरसेवक संजय बंगाले यांच्याकडून ही बातमी पोलीस व प्रशासनाला कळताच मदतकार्य सुरू झाले. यात दबलेल्या चारजणांना बाहेर काढण्यात यश आले तर किशोर टेकसुल्तान (४५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
 

Web Title: One killed, four injured in house collapse in Nagpur

टॅग्स :Accidentअपघात