तलावात बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:19+5:302021-04-19T04:08:19+5:30
कळमेश्वर : शेतालगतच्या तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा शिवारात शुक्रवारी (दि.१६) सायंकाळच्या ...

तलावात बुडून एकाचा मृत्यू
कळमेश्वर : शेतालगतच्या तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा शिवारात शुक्रवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
विठाेबा निंबाजी मानकर (६५, रा. गायकवाड ले-आऊट, ब्राह्मणी, कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. विठाेबा मानकर हे गुरुवारी (दि.१५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शेतात जाताे म्हणून घराबाहरे पडले. दरम्यान, सायंकाळ हाेऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला. मात्र ते कुठेही न आढळल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता असण्याबाबत कळमेश्वर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. दरम्यान, शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मुलगा शुभम हा शेतात गेला असता, त्यास शेताजवळील तलावाच्या पाण्यात बुडून ते मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी शुभम विठाेबा मानकर (२६, रा. शिक्षक काॅलनी, कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार राजेंद्र पाली करीत आहेत.