केरळ पूरपीडितांसाठी एका दिवसाचे वेतन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:39 IST2018-08-21T23:38:48+5:302018-08-21T23:39:52+5:30

केरळमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी देशविदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये यांनीदेखील याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा मानस करण्यात आला आहे. याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

One day's wages will be given for Kerala flood victim | केरळ पूरपीडितांसाठी एका दिवसाचे वेतन देणार

केरळ पूरपीडितांसाठी एका दिवसाचे वेतन देणार

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : महाविद्यालयांनादेखील करणार आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी देशविदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये यांनीदेखील याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा मानस करण्यात आला आहे. याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
केरळमधील स्थिती लक्षात घेता विद्यापीठ व महाविद्यालयांनी निधी संकलन करावे. तसेच केरळ राज्यातील जनतेच्या मदत आणि पुनर्वसनाच्या कार्याला मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी सोमवारी केले. राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संपर्क साधून राज्यपालांचे आवाहन कळविले. विद्यापीठांनी केरळ राज्यातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पंतप्रधान साहाय्यता निधीला मदत करण्याची सूचना त्यांनी कुलगुरूंना केली आहे.
यासंदर्भात कुलगुरू डॉ.काणे यांना विचारणा केली असता त्यांनी राज्यपाल कार्यालयातून अशा प्रकारचा फोन आल्याचे मान्य केले. केरळमधील स्थिती भयानक आहे. तेथील नागरिकांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. त्यामुळेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचे एका दिवसाचे वेतन मदतनिधीला देण्याचा मानस आहे. याबाबत २८ आॅगस्ट रोजीच्या व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संलग्नित महाविद्यालयांनी जास्तीत जास्त प्रमाणात मदत करावी, असे आम्ही आवाहन करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: One day's wages will be given for Kerala flood victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.