निवडणुकीच्या वादातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:57+5:302021-02-13T04:08:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक आटाेपताच आठ जणांसह इतरांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या स्काॅर्पिओवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. ...

निवडणुकीच्या वादातून एकास मारहाण
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक आटाेपताच आठ जणांसह इतरांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या स्काॅर्पिओवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. त्यात त्यांनी स्काॅर्पिओजवळ उभ्या असलेल्या तरुणास मारहाण करीत जखमी केले. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदाेली (राजा) येथे गुरुवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास घडली.
दीपक मारोती मारोडे (४५), दिनेश गुलाब डहाके (२८), रणभिर राजाराम डहाके (३८), दादाराव सोमाजी आडकिने (४७), प्रीतम प्रदीप मोटघरे (२५), पंकज प्रदीप मोटघरे (२७), सागर राजाराम डहाके (३८), शेषराव सहादेव इटनकर (३८), सर्व रा.हरदाेली (राजा), ता.कुही अशी आराेपींची नावे आहेत. कबिर जगदीश लोखंडे (२४, रा. हरदोली राजा, ता.कुही) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सरपंच व उपसरपंचपदाची निवडडणूक असल्याने कबिर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभा हाेता.
त्याच्या शेजारी ग्रामपंचायत सदस्यांनी एमएच-४०/एसी-७१३ क्रमांकाची स्काॅर्पिओ उभी हाेती. आराेपींनी काही कळण्याच्या आत त्या स्काॅर्पिओवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. त्यामुळे कबिर व त्याच्या मित्रांनी आराेपींना शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कबिरलाच बेदम मारहाण केली. त्याच्या डाेक्यावर सिमेंटच्या गट्टूने वार केल्याने ताे गंभीर जखमी झाला. दरम्यान, बंदाेबस्तासाठी आलेल्या पाेलिसांनाही आरेापींनी धक्काबुक्की केली.
त्याच्यावर कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी वेलतूर पाेलिसांनी या आठ आराेपींसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध भादंवि ३६३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार आनंद कविराज करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती.