महारॅलीसाठी काँग्रेस नेत्यांची ‘वज्रमूठ’; युवक काँग्रेसची शहरात बाइक रॅली, नेत्यांनी केली सभास्थळाची

By जितेंद्र ढवळे | Published: December 26, 2023 10:11 PM2023-12-26T22:11:53+5:302023-12-26T23:09:14+5:30

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

On the occasion of the foundation day of Congress, a grand rally is being held in Nagpur on 28th December 'Hai Prat Hum'. | महारॅलीसाठी काँग्रेस नेत्यांची ‘वज्रमूठ’; युवक काँग्रेसची शहरात बाइक रॅली, नेत्यांनी केली सभास्थळाची

महारॅलीसाठी काँग्रेस नेत्यांची ‘वज्रमूठ’; युवक काँग्रेसची शहरात बाइक रॅली, नेत्यांनी केली सभास्थळाची

नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘है तयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर होणाऱ्या या रॅलीच्या दमदार आयोजनासाठी काँग्रेस नेत्यांनी ताकद लावली आहे. मंगळवारी युवक काँग्रेसने बाइक रॅली काढून महारॅलीसाठी शहरात जागर केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत विविध समित्या जाहीर करीत सभेच्या आयोजनासंदर्भात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. उपरोक्त वरिष्ठ नेत्यांसह माजी मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, गिरीश पांडव यांच्यासह विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.

‘भारत जोडो बाइक’ रॅलीने लक्ष वेधले
२८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महारॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरात ‘भारत जोडो’ बाइक रॅली काढण्यात आली. तीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश प्रभारी उदयभानू चिब, राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, राष्ट्रीय सचिव अजित सिंह, एहसान खान, आतिशा पैठनकर, शिवराज मोरे, श्रीनिवासन नालंवार, मिथिलेश कन्हेरे, तौसीफ खान, आसिफ शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संघभूमीतून भाजपला उत्तर देणार : चव्हाण
केंद्रातील भाजप सरकार बेरोजगारी, महागाई तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून काँग्रेस भाजपला चोख उत्तर देणार असल्याचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सत्ता परिवर्तनाचा बिगुल फुंकणार : वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार यांनीही सभास्थळी दाखल होत तयारीचा आढावा घेतला. विदर्भातील जनतेने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस देशात सत्ता परिवर्तनाचा बिगुल फुंकणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

‘वंचित’साठीही तयार
महारॅलीपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. ‘वंचित’ला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत अशोक चव्हाण यांनीही सकारात्मकता दर्शविली. यासंदर्भात दिल्ली येथे दि. २९ रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विविध समित्यांची स्थापना
महारॅलीच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसने विविध समित्यांची स्थापना केली. यात ७५ सदस्यांच्या आयोजन समितीचाही समावेश आहे. यात राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोध पक्षनेते विजय वडट्टीवार, आजी-माजी खासदार आणि आमदारांचा समावेश आहे.

Web Title: On the occasion of the foundation day of Congress, a grand rally is being held in Nagpur on 28th December 'Hai Prat Hum'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.