शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने इंडिया आघाडीची शक्तिप्रदर्शनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 17:35 IST2023-11-22T17:34:46+5:302023-11-22T17:35:33+5:30

हिवाळी अधिवेशन काळात ‘पॉलिटिकल धमाका’ : उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित राहणार

On the occasion of Sharad Pawar's birthday, 'INDIA Opposition Alliance' is preparing for a show of strength | शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने इंडिया आघाडीची शक्तिप्रदर्शनाची तयारी

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने इंडिया आघाडीची शक्तिप्रदर्शनाची तयारी

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी नागपुरात इंडिया आघाडीचे एक मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसमधील दिग्गज नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या काळात राज्यातील सर्वच राजकीय नेते नागपुरात डेरेदाखल असतील. नेमके याच काळात शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ‘पॉलिटिकल धमाका’ करण्याची योजना आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने दुफळीमुळे खचलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जाईल. तर भाजप विरोधी लढाईत राष्ट्रवादी आघाडीवर असेल, असा विश्वास इंडिया आघाडीतील घटक पक्षांना देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होणार आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी स्वत: दोन वेळा विदर्भाचा दौरा केला आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार हे सातत्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पक्षातील जुन्या जाणत्यांना सक्रिय केले जात आहे. विदर्भात राष्ट्रवादीसाठी वातावरण निर्मिती करण्याचाही पवारांचा प्रयत्न आहे.

Web Title: On the occasion of Sharad Pawar's birthday, 'INDIA Opposition Alliance' is preparing for a show of strength