१५ ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर होणार देशभक्तीचा सुमधूर जयघोष

By नरेश डोंगरे | Updated: August 14, 2025 00:17 IST2025-08-14T00:16:35+5:302025-08-14T00:17:01+5:30

देशाची लोकवाहिनी मानली जाणाऱ्या रेल्वेची धावपळ १२ महिने, ३६५ दिवस सुरू असते. या लेकुरवाळीतून प्रवास करणारी मंडळी जेथून चढतात आणि उतरतात.

On August 15, there will be a melodious cheer of patriotism at major railway stations across the country. | १५ ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर होणार देशभक्तीचा सुमधूर जयघोष

१५ ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर होणार देशभक्तीचा सुमधूर जयघोष

नरेश डोंगरे 

नागपूर :
शुक्रवारी १५ ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर देशभक्तीचा सुमधूर जयघोष होणार आहे. अशा प्रकारचा हा कर्णमधूर जयघोष विविध रेल्वे स्थानकांवर पहिल्यांदाच होणार असून आरपीएफचे जवान आपल्या संगीत सादरीकरणातून जनतेच्या हृदयात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणार आहेत.

देशाची लोकवाहिनी मानली जाणाऱ्या रेल्वेची धावपळ १२ महिने, ३६५ दिवस सुरू असते. या लेकुरवाळीतून प्रवास करणारी मंडळी जेथून चढतात आणि उतरतात. त्या ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांनो लक्ष द्या... प्रवाशांनो असे करा... ही काळजी घ्या..., अशा प्रकारचा उद्घोष नेहमीच कानावर पडतो. मात्र, यावेळी १५ ऑगस्ट २०२५ च्या स्वातंत्र्य दिनी विविध प्रांतातील प्रमूख रेल्वे स्थानकांवर यावर्षीपासूनच्या स्वातंत्र्य दिनी देशात एका ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ होणार आहे. तो म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या गाैरवशाली आणि पारंपारिक कार्यक्रमांसोबतच यंदा देशभक्तीने ओतप्रोत  'ऐ मेरे वतन के लोगो...वंदे मातरम..., सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है... आदी सुमधूर गितांच्या माध्यमातून भारत मातेला नमन केले जाणार आहे. देभभक्तीपर गितांसोबतच भारत मातेचा जयघोषही रेल्वे स्थानकांवर होणार आहे. यासाठी  रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) बँडचे ठिकठिकाणचे पथकं सराव करीत आहेत.  

महाराष्ट्रासह १२ राज्यात
 
 महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि बांद्रा रेल्वे स्थानकासह देशातील १२ प्रमुख राज्यांतील मुख्य रेल्वे स्थानकांवर हा देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या आयोजनाची जबाबदारी रेल्वेच्या विविध विभागीय कार्यालयांना (डीआरएम) देण्यात आली आहे. त्यासाठी शानदार शामियाना, स्टेज आणि प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.
 
या स्थानकांवर होणार कार्यक्रम
 
महाराष्ट्रातील मुंबई, बांद्रा, हरियाणातील अंबाला छावणी रेल्वे स्थानकासह राजस्थानमधील जयपूर, पश्चिम बंगालमधील हावडा तसेच सियालदाह, बिहारच्या पाटना, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज आणि गोरखपूर, आसामच्या गुवाहाटी, तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकमधील हुबळी आणि मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्थानकावर देशभक्तीच्या सुरांची ही मैफल सजणार आहे. 

नागपुरात बँड नाही 

नागपुरात मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अशी आरपीएफची दोन विभागीय कार्यालय आहेत. मात्र त्यांच्यापैकी एकाहीकडे बँड पथक नाही, असे दोन्ही आरपीएफच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर सिस्टमच्या माध्यमातूनच देशभक्तीचा जागर होईल.

Web Title: On August 15, there will be a melodious cheer of patriotism at major railway stations across the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.