दोन वाहनचालकांच्या निष्काळजीपणात वृद्धेचा गेला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 20:55 IST2020-11-06T20:54:22+5:302020-11-06T20:55:57+5:30
Accident, dead old woman निष्काळजीपणे वाहन चालवून कार आणि ऑटोचालकाने एकमेकांना धडक मारल्याने ऑटोतील वृद्धेचा करुण अंत झाला. तर तिची मुलगी जबर जखमी झाली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला.

दोन वाहनचालकांच्या निष्काळजीपणात वृद्धेचा गेला बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - निष्काळजीपणे वाहन चालवून कार आणि ऑटोचालकाने एकमेकांना धडक मारल्याने ऑटोतील वृद्धेचा करुण अंत झाला. तर तिची मुलगी जबर जखमी झाली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला.
तुळजाई अनंत कुलकर्णी (वय ४७, रा. जयवंतनगर रामेश्वरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांची आई अंजना रमेश सदावर्ते (वय ७०) यांच्यासह गुरुवारी दुपारी १. ३० च्या सुमारास ऑटोने (एमएच ४९ - एझेड ५५१८) जात होत्या. आरोपी ऑटोचालक मोहम्मद ताजुब अल्ताफ हा निष्काळजीपणे ऑटो चालवित होता. त्याचप्रमाणे एमएच ४९ एएस ९९५८ क्रमांकाचा कारचालक आशिष भगवान बालपांडे (वय ३३) तेवढ्याच निष्काळजीपणे समोरून येत होता. पांडे ले-आऊटमध्ये दोघांनी एकमेकांच्या वाहनांना समोरासमोर जोरदार धडक मारली. त्यामुळे ऑटोतील मायलेकी जबर जखमी झाल्या. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी अंजना सदावर्ते यांना मृत घोषित केले. तुळजाई कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.