शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले

By admin | Updated: January 31, 2015 02:17 IST

बाथरुमच्या दरवाज्याला छिद्र पाडून आत प्रवेश केलेल्या आरोपींनी वृद्ध प्रॉपर्टी डीलर आणि त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे एक लाखाचे दागिने लुटून नेल्याची घटना

नागपूर : बाथरुमच्या दरवाज्याला छिद्र पाडून आत प्रवेश केलेल्या आरोपींनी वृद्ध प्रॉपर्टी डीलर आणि त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे एक लाखाचे दागिने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरात घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.प्रकाश चंद्रिकापुरे (५८) हे गीतानगरात राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि सून राहतात. गुरुवारी रात्री चंद्रिकापुरे आणि त्यांची पत्नी घरी होते. त्यांचा मुलगा कामानिमित्त बल्लारशाला गेला होता तर सून माहेरी गेली होती. रात्री १ ते २.३० वाजताच्या दरम्यान आरोपींनी बाथरुमच्या दरवाज्याला कटरच्या साहाय्याने छिद्र पाडले. छिद्रातून तार टाकून दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर त्यांनी घरात आत प्रवेश केला. सुरुवातीला चोरट्यांनी घरातील दागिने शोधले. परंतु त्यांना काहीच आढळले नसल्याने ते चंद्रिकापुरे यांच्या बेडरुममध्ये आले. त्यांचा गोंधळ ऐकून चंद्रिकापुरे दाम्पत्याला जाग आली. आरोपींनी त्यांना शस्त्र दाखवून दागिने काढण्यास सांगितले. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चंद्रिकापुरे यांनी आठवडाभरापूर्वीच सोन्याची चेन तयार केली होती. त्यांनी चेन, अंगठी, पत्नीचे मंगळसूत्र, टॉप्स आरोपींना दिले. आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या चंद्रिकापुरे दाम्पत्याने काही वेळानंतर शेजारी आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. गिट्टीखदानचे रात्रपाळी अधिकारी के. डी. भगत आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी बाईकवर आले असल्याने त्यांचा सुगावा लागला नाही. चंद्रिकापुरे प्रॉपर्टी डीलर असल्याचे तसेच त्यांचा परिवार बाहेरगावी गेल्याची माहिती आरोपींना असल्याची पोलिसांना शंका आहे. (प्रतिनिधी)