शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:58 IST

एका हत्याप्रकरणात फिर्यादी आणि मुख्य साक्षीदार असलेल्या तरुणाच्या बहिणीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार मोबाईलवर फोन, मेसेज करणे, तिला पिक्चरला चलण्याची ऑफर देणे पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले. तरुणीने तक्रार नोंदविल्यामुळे अजनी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस.एस. टेमगिरे याच्याविरुद्ध अजनी ठाण्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देतक्रारदाराच्या बहिणीसोबत सलगीचा प्रयत्न : वारंवार, फोन मेसेज करून संपर्क : पिक्चरला चलण्याची ऑफर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका हत्याप्रकरणात फिर्यादी आणि मुख्य साक्षीदार असलेल्या तरुणाच्या बहिणीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार मोबाईलवर फोन, मेसेज करणे, तिला पिक्चरला चलण्याची ऑफर देणे पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले. तरुणीने तक्रार नोंदविल्यामुळे अजनी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस.एस. टेमगिरे याच्याविरुद्ध अजनी ठाण्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. २१ मे च्या रात्री अजनीतील गुंडांनी आशुतोष वर्मा नामक तरुणाची हत्या केली होती. आशुतोषला वाचविण्यासाठी धावलेल्या एका तरुणावरही आरोपींनी हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. याच जखमी तरुणाने अजनी ठाण्यात हत्येची तक्रार नोंदविली होती. पोलिसांच्या रेकॉर्डवर तो या प्रकरणातील फिर्यादीच नव्हे तर मुख्य साक्षीदारही आहे. तो थोडा अडखळत बोलतो. त्यामुळे त्याच्यासोबत त्याची बहीण (वय २५) काही वेळा पोलीस ठाण्यात आली होती. येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक टेमगिरेने तिचा मोबाईल नंबर घेतला होता. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने २७ मे पासून टेमगिरेने तिला बोलवणे सुरू केले. संपर्क वाढवण्यासाठी त्याने तिला फोन, मेसेज करणे सुरू केले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता टेमगिरने त्या तरुणीला सिनेमाला चलण्याची आॅफर दिली. तिला सिनेमाच्या दोन तिकिटांचा फोटो काढून तो व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविला. कधी पोलीस ठाण्यात तर कधी ठाण्याबाहेर उशिरारात्रीपर्यंत तिला भेटायला बोलवून टेमगिरेने तिच्याशी सलगी वाढवण्याचे प्रयत्न चालविल्याने तरुणीने शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे टेमगिरेची तक्रार केली. तो लज्जास्पद वर्तन करतो, असेही तक्रारीत नमूद करून त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावला.उलटसुलट चर्चेला उधाणतरुणीच्या तक्रारीच्या संबंधाने अजनी ठाण्यात दिवसभर भूकंपासारखे वातावरण होते. उलटसुलट चर्चा अन् वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दिवसभर मंथन झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री टेमगिरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण टेक्निकल स्वरूपाचे असल्यामुळे टेमगिरेला तूर्त अटक करण्याचे पोलिसांनी टाळले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे अजनीचे ठाणेदार उरलागोंडावार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिस