शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील अध्ययन अक्षमता केंद्राला सरकारी खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:19 IST

डिस्लेक्सियाग्रस्ताना त्यांच्या जिल्ह्यातच आजाराचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, परंतु दोन वर्ष होत असतानाही विदर्भात एकाही ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या आदेशालाच खोप्रमाणपत्रासाठी डिस्लेक्सियाग्रस्तांची मुंबईवारी सुरूच

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिस्लेक्सियाग्रस्ताना त्यांच्या जिल्ह्यातच आजाराचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, परंतु दोन वर्ष होत असतानाही विदर्भात एकाही ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही. विशेष म्हणजे, हे केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या पदनिर्मिती झालीच नसल्याने हे केंद्र खोळंबले आहे. परिणामी, प्रमाणपत्रासाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबई गाठावी लागत आहे.‘डिस्लेक्सियाग्रस्त’ व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. आमीर खान यांच्या ‘तारे जमीनपर’ या चित्रपटातून या विकाराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली. ‘डिस्लेक्शिया’ या अवस्थेत मेंदूचा डावा भाग पुरेसे काम करत नाही किंवा त्या भागातील संदेश उजव्या भागाकडे वहन करून नेणारे मज्जातंतू पुरेसे कार्यक्षम नसतात. यामुळे ही बाधा झालेल्या व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. सामान्य माणसाला पटकन समजणारी आणि त्याच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटतात. त्यातला फरक त्यांना ओळखू येत नाही. शब्दांची रचना त्याच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे काहीही लिहिताना वेगवेगळ्या असंख्य चुका करतात.सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. हा विकार वेळीच ओळखता आल्यास व त्याला विशेष तज्ज्ञाकडून प्रशिक्षण दिल्यास या विकारांची मुले आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचे धनी होऊ शकतात. या आजाराच्या रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना आहेत. परंतु याचा फायदा पुणे, मुंबईच्याच रुग्णांना मिळत आहे. कारण या ठिकाणच्या इस्पितळातच ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू आहे. येथेच रुग्णांची चार ते पाच वेळा तपासणी करून हा आजार असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. याला घेऊन २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली.१ फेब्रुवारी २०१६ मध्ये यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विभागात हे केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु या केंद्रासाठी लागणाऱ्या स्वतंत्र मानसोपचारतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक (स्पेशल एज्युकेटर) असे तीन पदांची निर्मितीच झाली नसल्याने हे केंद्र आजही रखडलेलेच आहे.

सुरू झालेले केंद्र पडले बंदमिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये आॅक्टोबर-२०१६ मध्ये ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू झाले. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नेमक्या चुका माहिती करून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व विशेष शिक्षकाचे पदच भरण्यात आले नाहीत. यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. मेडिकल प्रशासनाने या दोन्ही पदांचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. यामुळे प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईचा रस्ता दाखविला जात आहे.

प्रमाणपत्र असल्यास असे मिळतात लाभ

  • ‘डिस्लेक्सियाग्रस्ता’चे प्रमाणपत्र असल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत जास्त वेळ दिला जातो.
  • शाळेत विशेष शिक्षक दिले जातात.
  • अभ्यासक्रमात जे विषय खूपच कठीण वाटतात, त्या विषयाची सूट दिली जाते.
  • अशा मुलांच्या आई-वडिलांना करातून सूट मिळते.
  • नोकरी बदलीचे नियमही शिथिल होतात.
टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार